Bibtya | कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्या ठार, धारणगाव शिवारात वन विभागाची कारवाई | NDTV मराठी

कोपरगाव तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे. काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरु होता. एकाच आठवड्यात त्याने दोन बळी घेतले होते. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. कोपरगावच्या टाकळी परिसरात 4 वर्षाच्या नंदिनी चव्हाण आणि साठ वर्षाच्या शांताबाई निकोले या दोघींवर बिबट्याने जीवघेणा हल्ला करुन ठार केले होते..

संबंधित व्हिडीओ