केंद्रातल्या महिला आरक्षण आणि प्रभाग पुनर्रचना विधेयकाच्या नामंजुरीचे पडसाद मुंबई महानगरपालिकेत सुद्धा उमटले.. जिथे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांमध्ये त्यांच्या वेशभूषेच्या माध्यमातून एक आगळावेगळा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.या विधेयकाविरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी आणि संताप व्यक्त करण्यासाठी, भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक काळे कपडे परिधान करून सभागृहाच्या कामकाजात सहभागी झाले