Mumbai BMC| आयुक्तांच्या दालनातील Sound system वरून वाद, नगरसेवकांना सुद्धा हवी नवी साऊंड सिस्टीम

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनशेजारील सभागृहासाठी ५.४९ कोटींची नवीन साऊंड सिस्टीम प्रस्तावित करण्यात आली आहे. पण हा प्रस्तावच वादात सापडण्याची चिन्ह आहेत.. विद्यमान यंत्रणा जुनी असल्याने प्रशासनाने त्वरित निर्णय घेतल्याचं कळतं. पण पालिकेच्या पहिल्या मजल्यावरील नगरसेवकांच्या सभागृहात मात्र जुनीच ऑडिओ सिस्टीम कायम आहे.. त्यात काही तृटी आहेत.. बैठकीत अनेकदा नगरसेवकांना माईक हातात देऊन बोलण्याची वेळ येते.. यामुळे यापूर्वी सुद्धा नगरसेवकांनी अनेकवेळा नवीन यंत्रणेची मागणी केली होती.. काही विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल नापसंती व्यक्त केली.

संबंधित व्हिडीओ