जपानमध्ये सोमवारी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा जोरदार भूकंप झाला. त्यानंतर किनारी भागांमध्ये त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.जपान हवामान एजन्सीनं, इवाते प्रांत आणि होक्काइडो, आओमोरीच्या काही भागांमध्ये 3 मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली. नागरिकांनी तात्काळ उंच ठिकाणी जावं तसंच किनारी भागापासून, नद्यांपासून दूर राहावं असं आवाहन सरकार तर्फे कऱण्यात आलं.भूकंपाचे धक्के बसल्यानंतर तोहोकू शिंकानसेन बुलेट ट्रेन सेवा टोकियो स्टेशन आणि शिन-आओमोरी स्टेशन दरम्यान तात्पुरती थांबवण्यात आली.तसंच फुकुशिमा दाइची आणि फुकुशिमा दाइनी अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला अर्थात तिथं कोणत्याही प्रकारचा रेडिएशनची घटना घडलेली नाही.