मुंबईतील कबुतरखाने बंद ठेवायचे की नाही या विषयावर महत्त्वाची सुनावणी आज (13 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयात झाली. यावेळी कबुतरखान्यांवरील बंदी तुर्तास कायम ठेवण्याचा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीमध्ये कबुतरांना सकाळी 6 ते 8 या वेळेत काही अटींसह खायला देता येईल का? यावर विचार करता येईल असं मुंबई महापालिकेनं न्यायालयात स्पष्ट केले. त्यावर कबुतरांच्या आरोग्याचा विचार करा, असं न्यायालयानं महापालिकेला सुनावलं.