सारं जग शुक्रवारी अलास्कामध्ये काय घडतंय याकडे डोळे लावून बसलंय. कारण शुक्रवारी अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प आणि रशियन अध्यक्ष पुतीन यांच्यात महत्त्वाची शिखर परिषद पार पडतेय. अमेरिकेचं ४९वं राज्य असलेल्या अलास्कामधील अँकोरेज या सर्वात मोठ्या शहरात ही बैठक होतेय. अमेरिकेच्या एल्मेनडॉर्फ-रिचर्डसन मिलीटरी बेसवर दोन्ही राष्ट्रप्रमुख आमनेसामने बसून चर्चा करणार आहेत. चर्चेचा मुद्दा अर्थातच युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करणं. आणि युद्ध थांबवणं... मात्र रशिया आणि युक्रेन यांच्या मागण्या या परस्परविरोधी आहेत आणि दोघेही आपल्या अटींवर ठाम आहेत. त्यामुळे जगातली सहा युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्प यांची हे युद्ध थांबवताना खरी कसोटी लागणार आहे..