शक्तिपीठ महामार्ग करायचा असेल तर आधी राजीनामे द्या,निवडणूक जिंकून दाखवा आणि मगच शक्तीपीठ करा,असे आव्हान अपक्ष खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला दिले आहे.मतदान विरोधात जाईल म्हणून शक्तिपीठ करणार नाही,अशी घोषणा निवडणुकीपूर्वी केलं आणि निवडून आल्यावर आता शक्तिपीठ करणारच,अशी भूमिका घेतली जात आहे. मग जमिनी घेणारच असाल,तर राजीनामे द्या आणि शक्तीपीठ करणारच या मुद्द्यावर निवडणूक लढवून जिंकून दाखवा,असे आव्हान खासदार विशाल पाटलांनी महायुती सरकारला केला आहे.सांगलीच्या बुधगाव मध्ये पार पडलेल्या शक्तिपीठ बाधित शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.