Global Report| रशिया-युक्रेनसह साऱ्या जगाचे डोळे अलास्काकडे, साऱ्या जगाचं या बैठकीकडे लक्ष का?

आता बैठक दोन राष्ट्रप्रमुखांमध्ये. मात्र साऱ्या जगाचं या बैठकीकडे लक्ष का? तर ही बैठक गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या युद्धाच्या समाप्तीच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते.... अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध आपणच थांबवू शकतो असा दावा सातत्यानं करत आलेत. अर्थात युद्ध काही थांबलेलं नाही. मात्र पुतीन यांना वाटाघाटींच्या मेजापर्यंत ते घेऊन आलेले आहेत. त्यामुळे आता या पहिल्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते. ट्रम्प हे पुतीन यांना काय गळ घालतात आणि मुळात पुतीन हे आपला हट्ट सोडून हे युद्ध थांबवण्याच्या दिशेनं विचार करतात का हे प्रश्न साऱ्या जगासाठी महत्त्वाचे आहेत कारण गेले तीन वर्ष या युद्धामुळे साऱ्या युरोपच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आलाय. तर भारतासाठीही ही बैठक महत्त्वाची आहे कारण अलिकडेच भारतावर लादला गेलेला अमेरिकन टॅरिफ. तेव्हा पाहूया या बैठकीतून कुणाकुणाला काय काय अपेक्षा आहेत ते

संबंधित व्हिडीओ