उज्ज्वल निकम.... भल्याभल्या आरोपींचा कर्दनकाळ ठरणारे निकम सध्या स्वतःच आरोपांच्या घेऱ्यात आहेत.निकमांवर आरोप आहे ऑफिस ऑफ प्रॉफिटचा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार उज्वल निकम अपात्र ठरतील, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केलाय. ज्या दिवशी निकमांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली, त्याचवेळी सरकारी वकील म्हणून निकमांना बाजू मांडता येणार नाही, हे स्पष्ट झालं. मग अजूनही उज्ज्वल निकमांनी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती स्वतःहून का सोडली नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय.