15 ऑगस्टच्या दिवशी जीएसटीत मोठे बदल करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. 12% च्या ऐवजी आता 5 % जीएसटीचा प्रस्ताव देण्यात आला. तर 28 % स्लॅबच्या वस्तुंवर आता 18 % जीएसटीचा प्रस्ताव दिलाय 12% स्लॅबमधल्या 99 टक्के वस्तुंवर 5% टक्के जीएसटी होणार आहे.सध्याचा 12% आणि 28% स्लॅब पूर्णपणे रद्द होईल, दिवाळीपासून हे मोठे बदल होण्याची शक्यता आहे.दरम्यान, दिवाळीत देशवासियांना मोठी भेट देणार असल्याचं वक्तव्य मोदींनी लालकिल्यावर केलं होतं.जीएसटी सुधार कार्यक्रम लागू करणार असल्याचं मोदींनी म्हटलं.