मुंबईत दहीहंडी उत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदा पथक जास्तीतजास्त थर लाऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करणार आहेत तर आयोजकांनीही याची तयारी सुरू केली आहे.पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे गेल्या 20 वर्षांपासून दहीहंडीच मोठ्या प्रमाणात आयोजन करत असतात...यावर्षी एकविसाव वर्ष आहे. मागाठाणे येथील देवपाडा मैदानात जोरदार तयारी सुरू आहे स्वतः आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे पुत्र राज सुर्वे यांनी तयारीची पाहणी केलीय...जास्तीत जास्त थर लावून दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला २५ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय.. यावर्षी कर्करोग ग्रस्तांना मदत करणार असल्याचे राज सुर्वे यांनी सांगितले . मनोरंजनासाठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार या दहीहंडीला हजेरी लावणार असल्याचे आयोजक राज सुर्वे यांनी सांगितलं .