P.V.Kulkarni च्या बेकायदा बांधकामावर बुलडोजर चालवणार; मोटेगावकरच्या क्लासवर Pune पालिकेची कारवाई

नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी याच्या अडचणी वाढल्या आहेत.बीड शहरातील शाहूनगर भागात कुलकर्णी याचे सुरू असलेले इमारतीचे बांधकाम पूर्णपणे बेकायदा असल्याचे समोर आले आहे.या बांधकामावर आता नगरपरिषद बुलडोजर चालवणार आहे. नगरपरिषदेच्या या कारवाईनंतर बीडमध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातून एक मोठी बातमी आहे. प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या प्रसिद्ध आरसीसी पॅटर्न क्लासवर पुणे महानगरपालिकेने कारवाई केली आहे. महापालिकेच्या भवन विभागाने हा क्लास सील केला आहे. क्लासच्या इमारतीवर महापालिकेने नोटीस देखील लावली आहे.

संबंधित व्हिडीओ