Chh.Sambhajinagar| एशियन हॉस्पिटलच्या NICUमध्ये आग, कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन 9 बाळांना वाचवलं

आणि आता एक अतिशय थरारक पण चांगली बातमी... छत्रपती संभाजीनगरच्या एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागली.... जिथे जन्मलेल्या बाळांना ठेवलं जातं... त्या NICU मध्ये ही आग लागली... त्यावेळी हॉस्पिटलमधल्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी अक्षरशः जीव धोक्यात घालत NICUमधून ९ बाळांचा सुखरुप सुटका केली... त्याचाच हा थरारक व्हिडीओ.... एशियन हॉस्पिटलमधल्या NICUला मध्यरात्री आग लागली... आग लागली त्यावेळी ९ बाळांवर NICUमध्ये उपचार सुरू होते... एसीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचं समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं.

संबंधित व्हिडीओ