परभणी जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचले आहे. यामुळे कापूस आणि सोयाबीनसारखी महत्त्वाची पिके करपू लागली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.