देशभरातील माओवादी संघटनांनी सशस्त्र संघर्ष तात्पुरता थांबवून शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. नक्षलवादी संघटनेच्या प्रवक्त्याने याबाबत पत्र जारी केले असून, एका महिन्यासाठी नक्षली कारवाया थांबवण्यास ते तयार आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या आवाहनानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले असून, ते सरकारसोबत व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा करणार आहेत.