केरळमधील एका मल्याळम चित्रपटातून प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. 'बॅक बेंचर' हा कलंक दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 'यू' आकारात बसवले जाणार आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.