धाराशिवमध्ये पंचनाम्यात अडचणी! अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करताना अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतात चिखल असल्याने अधिकाऱ्यांना आत पोहोचणे कठीण झाले आहे. भूम तालुक्यातील चिंचोली गावात पंचनामा करण्यासाठी आलेले तलाठी पाय घसरून पडले आहेत. शेतकऱ्यांनी या गंभीर परिस्थितीत सरसकट मदतीची मागणी केली आहे.