जालन्यात मुसळधार पाऊस! रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना जिल्ह्यातील पूर्णा, अंजना, आणि मांगणी या तिन्ही नद्यांना भीषण पूर आला आहे. निमगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने भोकरदन-हसानाबाद संपर्क तुटला आहे. रात्री उशिरा झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी हताश झाले आहेत.