नितीन राऊतांनी संघाचे निमंत्रण नाकारले! काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विजयादशमी सोहळ्याच्या आमंत्रणाला नकार दिला आहे. एका व्हिडिओद्वारे त्यांनी आपले मत व्यक्त केले. 'मी संघभूमीचा नव्हे, दीक्षाभूमीचा कार्यकर्ता आहे,' त्यामुळे संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.