बीड तालुक्यातील एका गावातून धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या एका पीएसआयवरच फसवणुकीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.. पवन निंबाळकर नावाच्या पीएसआयने लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणीला व तिच्या कुटुंबीयांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले असतानाच अचानक नवरदेवाने लग्नास नकार दिल्याने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आई-वडिलांनी आयुष्यभराची कमाई, दागिने, कपडे, साखरपुडा आणि लग्नाच्या तयारीवर खर्च केली... मात्र शेवटी त्यांच्या पदरी आली ती फक्त फसवणूक आणि बदनामी. विशेष म्हणजे, या घटनेनंतर आई-वडिलांनी पीएसआय आणि त्याच्या कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्याच्या गावी गेले असता त्यांच्याकडे 20 तोळे सोनं आणि दहा लाख रुपये हुंडा देण्याची मागणी करण्यात आली.