वसई विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील , गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिमेच्या बोळींज रुग्णालयात भेट दिल्या नंतर भयानक वास्तव समोर आलं असून. माता बालसंगोपनासाठी देण्यात येणारे कित्येक प्रोटीनचे डबे, मुदतबाह्य झालेले मलमाचे ट्यूब्स कचऱ्यात फेकण्यात आले होते. इतकच नव्हे तर ते प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक आरोप देखील मनोज पाटील यांनी केला आहे. या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाबाबत घटनास्थळावरून विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी.