मुंबईतील स्वदेशी मार्केटला आज 117 वर्षे पूर्ण झालेली आहेत. याच स्वदेशी मार्केटच्या काळबादेवी परिसरात इंग्रज सरकार विरोधात स्वदेशीचा नारा देत थोर क्रांतिकारी बाबू गेनू सैद यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. विदेशी कपड्यांच्या ट्रकला रोखण्यासाठी त्यांचे हे बलिदान आपल्याला आजही स्वदेशीसाठी प्रेरणा व दिशा देते. त्यांचा हा जाज्ज्वल्य वारसा मुंबईच्या प्रसिद्ध कापड बाजारातील 'स्वदेशी मार्केट' ही संस्था गेल्या ११७ वर्षांपासून अभिमानाने जपत आहे. या ऐतिहासिक स्वदेशी मार्केटचा पुनर्विकास होणारच असं आश्वासन भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. या विकासकामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. आणि कोणत्याही सदस्याला त्रास होणार नाही असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केलाय..