Nashik| नाफेड खरेदी केंद्राकडे कांदा उत्पादकांची पाठ; प्रतिक्विंटल 1,580 रुपये दर न परवडणारा

केंद्र सरकारकडून कांद्याला किमान १५८० रुपयांचा हमी खरेदी दर जाहीर करून आजपासून खरेदी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी नाशिक जिल्ह्यातील चित्र मात्र वेगळंच पाहायला मिळतंय... नाफेडच्या खरेदी केंद्रांकडे कांदा उत्पादकांनी पाठ फिरवली असून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या १९ केंद्रांवर शुकशुकाट दिसून येतोय... कारण बाजारपेठेत मिळणारा तुलनेने चांगला दर आणि नाफेडच्या खरेदीतील जाचक अटी, नियम यामुळे शेतकरी या प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचं चित्र आहे... लासलगाव येथून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी घेतलाय याचा आढावा...

संबंधित व्हिडीओ