वसई-विरार पट्ट्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ एकहाती सत्ता राखणारे भाई म्हणजेच हितेंद्र ठाकूर यांचा 'बहुजन विकास आघाडी' पक्ष थेट शिवसेनेत विलीन होणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली आहे. एकनाथ शिंदेंनी ठाकूर पिता-पुत्रांना एक अशी 'स्मार्ट ऑफर' दिली आहे, ज्यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्याचं संपूर्ण राजकीय गणितच बदलून जाऊ शकतं. पण या बदल्यात ठाकूर यांना काय मिळणार? एकनाथ शिंदेंची ही नेमकी कोणती चाल आहे?