जळगावमधील श्याम नगर परिसरात गेल्या तब्बल 30 तासांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.इलेक्ट्रिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा बंद पडल्याची माहिती समोर आली आहे.मात्र 30 तास उलटूनही महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला नाही.एकीकडे वाढते तापमान आणि वाढलेल्या आद्रतेमुळे नागरिक आधीच त्रस्त झाले आहेत.त्यातच दीर्घकाळ वीज नसल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांचे विशेष हाल होत असून महावितरण विभागाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.