भोंदूबाबा अशोक खरात यांचा सीए ललित पोफळे आणि प्रकाश पोफळे यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर ईडीने गेल्या दोन दिवसांपासून छापेमारी सुरू केली आहे.पुण्यातील मुकुंदनगर येथील सुजय गार्डन बी बिल्डिंग आठवा मजल्यावर ललित पोफळे आणि प्रकाश भोपळे यांचा फ्लॅट आहे. पहाटे सहा वाजल्यापासून प्रकाश पोकळे आणि ललित पोफळे यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचं पथक दाखल झालं आहे. त्यांच्यासोबत सीआरपीएफ आणि स्थानिक पोलीस देखील आहेत. गेल्या 8 तासांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. याचा आढावा घेतला आहे आमची प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी..