Pimpri मध्ये PMRDA चा ऐतिहासिक पराक्रम; अवघ्या 95 दिवसांत उभी राहिली 14 मजली इमारत | NDTV मराठी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) बांधकाम क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केलाय. पिंपरी चिंचवड येथील सेक्टर 12 मधील गृहप्रकल्पात केवळ 95 दिवसांत 14 मजली इमारत यशस्वीरित्या उभारण्यात आली आहे. या विक्रमी कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली असून, अशा प्रकारची देशातील ही पहिलीच घटना ठरली आहे.या प्रकल्पासाठी अत्याधुनिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या थ्री एस प्रि-फॅब तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष योगेश काजळे यांनी सांगितले की, चिखली येथील या प्रकल्पात सुमारे ६ हजार घरांसाठी ४० हून अधिक इमारतींचे बांधकाम याच प्रगत पद्धतीने करण्यात येत आहे.अतिवेगाने बांधकाम पूर्ण झालेल्या या इमारती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यावर विश्वास ठेवून सर्वसामान्य नागरिक आणि घरखरेदीदार या प्रकल्पाला कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.

संबंधित व्हिडीओ