राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 18 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ही मुदत आता काही दिवसांत संपणार आहे. त्याआधीच भाजपच्या वाहतूक सेनेचे नेते हाजी अराफात शेख यांनी पुन्हा 100 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.