FDA कडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, अन्न सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी 15 कठोर आदेश | NDTV मराठी

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आपण सगळ्यात वस्तू मुदत पाहून खरेदी करतो. पण असा मुदत संपलेला माल पुन्हा पॅकिंगनी करून विकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि मोठ्या रिटेल कंपन्यांचा मुदत संपलेला तसेच खराब झालेला माल फक्त कागदावरच नष्ट दाखवून पुन्हा छुप्या मार्गाने ग्राहकांच्या ताटात पोहोचवला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने या रॅकेटचा पर्दाफाश केला असून संपूर्ण महाराष्ट्रातील अन्न सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी १५ कठोर आदेश जारी केले आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संपूर्ण गैरप्रकाराची माहिती देत कडक कारवाई करण्याचा इशारा दिलाय.

संबंधित व्हिडीओ