Latur मध्ये खताची टंचाई, वाढीव किंमतीनं खतं खरेदी करावी लागत असल्यानं शेतकरी संकटात

लातूर जिल्ह्यात एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता खताच्या टंचाईने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. सरकार आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून दिले जात असल्याचा दावा केला जात असला, तरी एनडीटीव्हीने लातूरच्या बाजारपेठेत केलेल्या पडताळणीत वेगळेच चित्र समोर आले आहे. केंद्र सरकारने डीएपी खताची किंमत १३५० रुपये निश्चित केली आहे. मात्र, बाजारपेठेत मागणी असलेले डीएपी खत उपलब्ध नसल्याचे दिसून आले. शेतकरी डीएपीची मागणी करत असताना काही ठिकाणी त्याऐवजी उपलब्ध असलेले दुसरे खत घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे गरजेचे खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे.

संबंधित व्हिडीओ