Mumbai पोलिसांकडून CJP च्या अभिजीत दीपके, आशुतोष रांका, सौरव दासविरोधात Lookout Notice

मुंबई पोलिसांकडून CJPच्या तीन नेत्यांविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी. * कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके, सह-संयोजक आशुतोष रंका आणि सौरव दास यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर (LOC) जारी केले. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी दादर येथील शिवाजी पार्कवर परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी ही कारवाई. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी CJP कडून 'चलो मुंबई' आंदोलन आयोजित करण्यात आले होते. विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही आंदोलन झाल्याने ३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. या आंदोलनात ४ हजारांहून अधिक लोक सहभागी झाले होते. अभिनेता नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांचीही उपस्थिती होती. या प्रकरणात CJP च्या नेत्यांसह ४०० हून अधिक समर्थकांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

संबंधित व्हिडीओ