पुणे गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेलं पिस्टल सुमारे 50 हजार रुपयांना मध्यप्रदेशातून 15 दिवसांपूर्वी आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यासाठी ज्ञानेश्वर कोंडे याला पैसे देण्यात आल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसेच परवा अक्षय चव्हाणच्या घरी बैठक झाल्याचंही उघड झालं आहे. फिर्यादी न्यायालयात येणार असल्याची माहिती आधीपासूनच असल्याने हा हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत.