Global Report| US-Iran मधील चर्चा पुन्हा फसली; चर्चा रखडलेलीच, अपयशाचं खापर कोणावर?

अमेरिका-इराण दरम्यानची चर्चा सतत फसतेय. दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर अटींवर ठाम आहेत. अशात कस लागतोय तो पाकिस्तानचा. कारण पाकिस्ताननं या दोन देशांमध्ये समेट घडवून आणण्याची जबाबदारी एकट्यानं उचलली आहे. एकीकडे अमेरिकेसारखा बलाढ्य देश ज्याच्याकडून पाकिस्तानला भरघोस आर्थिक मदतीची गरज आहे, आणि दुसऱ्या बाजूला इराणसारखा मुस्लिम बंधू देश... पाकिस्तानच्या अमेरिका धार्जिण्या भूमिकेवर इराण प्रचंड नाराज झालाय. त्यामुळे सध्यातरी चर्चा रखडलेलीच दिसतेय आणि अपयशाचं खापर फुटतंय ते पाकिस्तानवर....

संबंधित व्हिडीओ