रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी रायगडचं पालकमंत्रिपद भरत गोगावले यांना मिळणं जवळपास निश्चित असल्याचा दावा केला आहे.तर शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी 15 ऑगस्टपासून भरत गोगावले जोमाने कामाला लागतील, असं म्हटलं आहे.दुसरीकडे, या संपूर्ण चर्चेवर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालकमंत्री ही अत्यंत फालतू गोष्ट असल्याचं वक्तव्य केलं आहे.