नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट मोडव आला आहे. बर्ड फ्लूग्रस्त पोल्ट्री फार्ममधील कर्मचारी तसेच कलिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. हे सर्व नमुने मानवी बर्ड फ्लू संसर्गाची तपासणी करण्यासाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी अर्थात NIV येथे पाठवण्यात येणार आहेत. एकूण आठ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असून, आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.