पोलिसांनी पैसे घेतल्याचा ट्रकचालकांचा आरोप; Malegaon Chalisgaon चौफुलीतील व्हिडिओ असल्याचा दावा

मालेगाव-चाळीसगाव चौफुली परिसरात पोलिसांकडून वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय.ट्रकचालकांनी व्हिडिओ शूट करत पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला... त्यावेळी पोलिसांनी पळ काढला.. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.डिओमध्ये “पोलिस मदत केंद्र, नाशिक ग्रामीण” असा फलक दिसत असून जवळच “जय बजरंग” हॉटेलही दिसत असल्याचे सांगितले जातंय. संबंधित ट्रकचालकाने काही पोलिस कर्मचारी ट्रकचालकांकडून वाहन पास करण्यासाठी पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केलाय. पोलिसांनी पोलीस चौकीतून पळताना दिसत आहेत तर त्यांना पकडण्यासाठी ट्रक चालक त्यांच्या मागे धावत आहेत असा संवादही या व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकू येतोय.दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठल्या ठिकाणचा आहे, तो कधीचा आहे आणि त्यातील आरोप कितपत सत्य आहेत याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

संबंधित व्हिडीओ