Heat Wave|उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी मानक कार्यपद्धती प्रसारित, Girish Mahajan यांची माहिती

वातावरणीय बदलांमुळे राज्यात हवामानात मोठे आणि अनियमित बदल दिसून येत आहेत. मे महिन्यात पाऊस, एप्रिलमध्ये गारपीट तसेच वर्षभर विविध ठिकाणी पावसाच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे.उष्णतेसारख्या आपत्तीचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी ठोस प्रणाली निर्माण केली जातेय. यासाठी मानक कार्यपद्धती तयार करण्यात आली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. उष्णतेचा प्रभाव असलेल्या देशातील दहा प्रमुख राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे.वातावरणातील बदलांमुळे राज्याच्या तापमान सातत्याने वाढत असून अनेक भागात तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे.

संबंधित व्हिडीओ