ठाण्यात धुवांधार पाऊस! ठाणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ११५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 'अतिमुसळधार पावसाचा' इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी.