पुण्यात गरबा बंद! नवरात्र उत्सवात पुण्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी गरबा कार्यक्रमात थेट धाड टाकत कार्यक्रम बंद पाडला. गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला. यापुढे नियमभंग करणारे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाहीत, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला आहे.