बातमी सांगलीतून आहे. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला त्यामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसलाय. पलूस मधील शेतकरी बापू पोळ यांची द्राक्षबाग उध्वस्त झाली आहे. पोळ यांचं लाखोंचं नुकसान झालंय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.