आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी भाषणावेळी पवारांवर भाष्य केलंय. पवारांची राजकारणातील गुगली अनेकांना कळत नाही, पवारांनी मला अजून गुगली टाकली नाही आणि भविष्यातही टाकणार नाही अशी आशा असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत.