केंद्रीय मंत्र्यांनी चुकीच्या वेळी केलेल्या ट्विटमुळे किती गोंधळ उडू शकतो, याचा प्रत्यय राज्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतोय, यंदा सोयाबीनचं बंपर उत्पादन झालं, सोयाबीन खरेदीची 6 फेब्रुवारीला मुदत संपली, पण त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती.ती मुदतवाढ मिळेल याची राज्यात गेली पाच दिवस याचीच चर्चा सुरू होती, पण जुन्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्याचं ट्विट केंद्रीय मंत्र्यांनी केलं.आणि राज्यभर गोंधळाला सुरूवात झाली नेमकं काय झालंय पाहुयात.