नंदुरबारमधील ल अक्कलकुवा शहरात येमनच्या दोन नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2015मध्ये भारतात राहायाला आलेले हे पती पत्नी व्हिसाची मुदत संपली तरी अक्कलकुव्यात राहात आहेत. वैद्यकीय व्हीसा घेऊन ते भारतात आले. त्यानंतर व्हिसाची मुदत न वाढवता हे दाम्पत्य राजरोसपणे अक्कलकुव्यात वास्तव्यास आहे. याप्रकरणी एकूण 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अक्कलकुव्यातील जामिया इन्स्टिट्यूटचे संस्थापक गुलाम वस्थानवी, प्रशासक हजेफा वस्थानवी, यमनचे खालीद इब्राहिम अलकादमी आणि त्यांची पत्नी खादीगा अशी या चौघांची नावं आहेतच.