रणवीर अलाहबादिया प्रकरणी कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचीही चौकशी होण्याची शक्यता.खार पोलिसांनी सगळ्या आरोपींशी संपर्क साधलाय. शोचा प्रमुख समय रैना देशाबाहेर असल्याचं पुढे आलंय.शिवाय रणवीर अलाहाबादियाशी मात्र अद्याप थेट संपर्क झालेला नाही तरी त्याच्या मॅनजरशी संपर्क साधण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय,खार पोलिसांनी बुक माय शो शीही संपर्क करुन शोमध्ये प्रेक्षक म्हणून सहभागी झालेल्या लोकांची यादी मागवण्यात येणार आहे.शोचं रेकॉर्डिंग 14 नोव्हेंबरला झालं होतं.त्यानंतर यू ट्यूबवर अपलोड केला गेला होता. रविवारी त्याच शोची क्लिप व्हायरल झाला आणि वाद निर्माण झाला.या शोचे आयोजक समय रैना आहेत. समयकडे या शोचे अनकट व्हिडिओ आहे. पोलिस समय देशात परतल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ जप्त करतील.