बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड पोलीसांवर सुरू असलेला प्रश्नांचा भडीमार अजूनही सुरूच आहे.बीडमधल्या इतक्या निर्घृण हत्येला पोषक वातावरण तयार व्हायला पोलीसांची निष्क्रियताच जबाबदार होती असं म्हणायला पुरेसा वाव आहे.पण हत्येसारखा गुन्हा घडल्यानंतरही बीड पोलीस ढिम्म हलले नाहीत.संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अवघ्या काही तासांतील एक सीसीटीव्ही पोलीसांच्या हाती लागलंय.या फुटेजमुळे पुन्हा एकदा बीड पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.