रायगड पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना आज रायगड जिल्हा नियोजनाची बैठक पार पडली.या बैठकीच्या आमंत्रणावरुन बरेच वाद झाले.या बैठकीला ज्यांना बोलवायचं होतं, त्यांना बोलावलंच नाही.तर ज्यांना बोलावलं ते आलेच नाहीच.अखेर फक्त तीन जणांमध्ये ही बैठक पार पडली.या बैठकीत काय ठरलं यापेक्षाही चर्चेत राहिलं ते या बैठकीनिमित्तानं रंगलेलं मानापमान नाट्यच