मंत्र्यांचे ओएसडी आणि खाजगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळालीय.मात्र मंत्र्यांचे खासगी सचिव आणि ओएसडी भविष्यात दलाली करताना आढळल्यास कडक कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.आतापर्यंत ज्या ज्या मंत्र्यांनी ओएसडी आणि खासगी सचिवांसाठी प्रस्ताव दिले होते, त्या सगळ्यांना मंजुरी देण्यात आलीय. काही मंत्र्यांकडून मात्र अजून यासंदर्भातले अर्ज आलेले नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे.