3 दिवसानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव निवळलाय. त्यामुळे आता लवकरच आयपीएलचेही सामनेही होणार आहेत.बीसीसीआय नव्या तारखांची घोषणा लवकरच करण्याची शक्यता आहे.बीसीसीआय लवकरच इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 पुन्हा सुरू करण्याबाबत अधिकृत घोषणा करू शकते. आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत 57 सामने खेळले गेले आहेत.58 वा सामना 8 मे रोजी धर्मशाळा येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात होता. परंतु भारत-पाकिस्तान तणावामुळे सामना मध्यभागी थांबवण्यात आला आणि नंतर सामना रद्द करण्यात आला.आता लीग टप्प्यात फक्त 12 सामने बाकी आहेत, त्यानंतर 4 प्लेऑफ सामने होतील.