जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा भडगाव एरंडोल या तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालीय... दरम्यान भडगाव ग्रामीण रुग्णालयातही पुराचे पाणी शिरल्याने रुग्णालयातील रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना अक्षरशः ट्रॅक्टर द्वारे रेस्क्यू करण्यात आले होते... मात्र पुराचे ओसरल्यानंतर आता ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवा पूर्वरत झाली असून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी...