महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडून आज जपानच्या टोकियो शहरात अभिजात मराठी अभिमान मराठी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. टोक्योमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल इन जपान या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात टोकियो मराठी मंडळाने विशेष सहकार्य केला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एवढा भव्य कार्यक्रम जपानमध्ये केला जातोय. या कार्यक्रमाला मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती आहेत. याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.